संगीत नाटक अकादमीचे उस्ताद बिस्मिला खाँ युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश

संगीत नाटक अकादमीच्या बहुप्रतिष्ठीत उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराची घोषणा सोमवारी नवी दिल्ली येथे करण्यात आली. संगीत, नृत्य, नाटक, पारंपारिक लोककला या क्षेत्रातील 33 युवा कलाकारांना हा पुरस्कार आज संगीत नाटक अकादमीने जाहीर केला. 

देशभरातील या क्षेत्रातील युवा कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी संगीत नाटक अकादमीद्वारे वर्ष 2006 पासून उस्ताद बिस्मिला खाँ पुरस्कार देण्यात येतात. संगीत, नृत्य, नाटक, पारंपारिक लोककला या क्षेत्रातील 40 वर्षाखालील कलाकारांना हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये संगीत विभागात पुढील कलाकारांचा समावेश आहे. भुवनेश कोमकली (हिंदुस्तानी गायन), कुमार सोमनाथ मर्दुर (हिंदुस्तानी गायन), सावनी तळवलकर (हिंदुस्तानी वाद्य संगीत-तबला), रंजनी व गायत्री बालसुब्रह्मण्यम (कर्नाटक गायन), गायत्री गिरीश (कर्नाटक गायन), एन. गुरुप्रसाद –(कर्नाटक वाद्य संगीत-घटम), बी. सी. मंजुनाथ (कर्नाटक वाद्य संगीत-मृदंगम), अनिरुद्ध अत्रेय (कर्नाटक संगीत-कंजीरा).

नृत्य क्षेत्रातील पुरस्कारार्थींमध्ये उमा सत्यनारायणन (भरत नाट्यम), अनुज मिश्रा (कथ्थक), कलामंडलम हरिनारायण ए. (कथकली), सिनाम बासु सिंह (मणीपुरी नृत्य), वेदांतम सत्य नरसिंह शास्त्री (कुचीपुडी नृत्य), युद्धिष्ठीर नायक (ओडिसी नृत्य), भावानंदा बरबायन (सत्रीय नृत्य), प्रिती बालचंद्रन अत्रेय (समकालीन नृत्य).

नाट्य क्षेत्रातील कलाकारांमध्ये नलिनी निहार नायक (दिग्दर्शन), आशीष निझावन (दिग्दर्शन), जसवीर कुमार (अभिनय), अदिती विश्वास (दिग्दर्शन), हैपी रंजित (अभिनय), संध्या गंगाधर साळवे (नाटक वेशभूषाकार), नलिनी आर. जोशी (नाटक -वेशभूषा), ज्ञानदेव सिंह (नाटक - प्रकाश संयोजन).


पारंपारिक, लोकनृत्य, मुकाभिनय, कठपुतली आदी क्षेत्रातील कलाकारांमध्ये लखविंदर वदाली (लोकसंगीत-पंजाब), फिरोज खाँ मंगणियार (लोकसंगीत-राजस्थान), नंदेश विठ्ठल उमप (लोकसंगीत-महाराष्ट्र), गणेश संपतराव चंदनशिवे (लोकसंगीत- तमाशा,महाराष्ट्र), पद्मिनी डोरा (लोकसंगीत-ओडिशा), विशाखा हरी (पारंपारिक संगीत-तामिळनाडू), विक्रम खखलारी (बोडो नृत्य-आसाम), मौमिता अडक (कठपुतली) आदींचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post